सोलापूर पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यावर ठोस कारवाई करत त्यांना थेट निलंबितच केले
सोलापूर:-(प्रतिनिधी ), विजापूर रोडवरील नागेश ऑर्केस्ट्रा बार निर्बंध असतानाही सुरू राहिला कसा आणि त्याची माहिती तुम्हाला का नव्हती, असा जाब विचारत पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यावर ठोस कारवाई करत त्यांना थेट निलंबितच केले आहे. तर डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह आठ जणांना मुख्यालयात आणले आहे.
विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील व डीबी पथकाचे प्रमुख शीतलकुमार कोल्हाळ यांची पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यात डीबी पथकातील राजकुमार तोळनुरे, श्रीरंग खांडेकर, पिंटू जाधव, शिवानंद भीमदे, अंबादास गड्डम, अतिश पाटील, इम्रान जमादार व राठोड या आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी अचानक केलेल्या तडकाफडकी बदल्यांमुळे शहर पोलिस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.

कामात हलगर्जीपणा चालणार नाही!
सर्वसामान्यांची सेवा करताना पोलिसांनी तत्पर राहायला हवे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निर्बंध कायम आहेत. तरीही, विजापूर रोडवरील नागेश ऑर्केस्ट्रा बार सुरू राहिला. सहाय्यक पोलिस आयुक्त कारवाई करतात पण, तेथील स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना माहिती होत नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त बैजल यांनी स्पष्ट केले. अवैध व्यवसायात भागीदारी अथवा संबंध, कामात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
सहसंपादक -मोहन भीमराव शिंदे